Best Bus Pass : 'बेस्ट' बसनं अमर्याद प्रवासासाठी दैनंदिन पासदर 50 वरून 60 रुपये
बेस्ट उपक्रमानं आपल्या बससेवेच्या दैनंदिन आणि मासिक पासदरात आजपासून वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दैनंदिन पासदरात १० रुपयांची आणि मासिक पासदरात दीडशे रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळं अमर्याद बसप्रवासासाठी दैनंदिन पासदर पन्नासवरून ६० रुपये करण्यात आला आहे. तसंच बेस्ट बसचा मासिक पासदर साडेसातशेवरून ९०० रुपये करण्यात आला आहे. आपण पाहूयात बेस्ट उपक्रमाच्या दैनंदिन आणि मासिक पासच्या नव्या योजना ग्राफिक्समधून.