Jitendra Awhad | इंदिरा गांधी यांच्याबद्दल आदर, माझ्या भाषणाचे अर्थ-अनर्थ काढले : जितेंद्र आव्हाड
बीडमधील माझ्या भाषणाचे अर्थ-अनर्थ काढले जात आहेत. पण इंदिरा गांधींना मानणारा मी राजकीय कार्यकर्ता आहे. इंदिरा गांधी यांच्या असामान्य कर्तृत्त्वाबद्दल मला प्रचंड आदर आहे, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे. आणीबाणीच्या माध्यमातून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता, असं जितेंद्र आव्हाड बीडमधील संविधान महासभेत केलं. या वक्तव्यावर काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करुन स्पष्टीकरण दिलं.