Lok Sabha 2024 : लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीची समन्वय बैठक, चंद्रकात पाटलांच्या उपस्थितीत बैठक
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLok Sabha 2024 : लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीची समन्वय बैठक, चंद्रकात पाटलांच्या उपस्थितीत बैठक
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीची समन्वय बैठक आज सकाळी 11 वाजता होणार आहे... बारामतीमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे...
या बैठकीला महायुतीच्या घटक पक्षातील नेते उपस्थित राहणार आहेत... परंतु या घटक पक्षाच्या बैठकीला विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील उपस्थित राहणार नसल्याने चर्चना उधाण आलंय..
काही दिवसांपूर्वीच विजय शिवतारेंनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं तर हर्षवर्धन पाटील यांनी मित्र पक्षाचे लोक धमकी देत असल्याची तक्रार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. त्यानंतर आज चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत समन्वयक बैठकीचं आयोजन करण्यात आलंय... सकाळी 11 वाजता चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे..