Bandra Bollywood Theme Park :वांद्रे येथे उभारणार बाॅलिवूड थीम पार्क
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBandra Bollywood Theme Park :वांद्रे येथे उभारणार बाॅलिवूड थीम पार्क मेट्रो रेल्वेचे खांब एकदा उभे राहिले की त्यावर हमखास राजकीय पक्षांचे पोस्टर लागतात. मुंबईत मात्र एक वेगळा प्रयोग केला जातोय. मेट्रो २बी या मार्गावरील ३५५ खांबांच्या दरम्यान बॉलिवूड थीन पार्क उभारलं जाणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचा गेल्या शंभर वर्षांचा इतिहास यातून उलगडून दाखवला जाणार आहे. बॉलीवूडमधील १९१३ ते २०२३ या मोठया कालखंडाचा विचार करुन त्या कालखंडातील महत्वाच्या घटना, सिनेमा, त्यातील स्टार, आणि प्रसंगावर या थिमची रचना करण्यात येणार आहे. दादासाहेब फाळकेंनी ज्या काळात अधिराज्य गाजवलं तो काळ, त्यानंतर १९१३ ते १९३९ पर्यंत, त्यानंतर १९७० पर्यंत आणि नंतर २०२४ पर्यंतच्या महत्त्वाच्या घटना यातून मुंबईकरांसमोर येणार आहेत. भाजपचे आमदार आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पाला जवळपास २०० कोटींचा खर्च येणार आहे, जो MMRDA कडून केला जाणार आहे. त्याबदल्यात उत्पन्नाचे स्रोत देखील तयार केले जाणार आहेत. ईएसआयसी नगर ते वांद्रे दरम्यान ७ स्टेशन आणि त्यामधील ३५५ खांबांमध्ये हे पार्क उभारलं जाणार आहे.