Balasaheb Thackeray Smruti Sthal Rada:बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावरThackeray vs Shindeगटांमध्ये राडा

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिंदे गट  आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले. आज बाळासाहेबांचा ११वा स्मृतिदिन आहे.. स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करून गेल्यानंतर  शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये राडा झाला. परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गद्दार...गद्दार...अशी घोषणाबाजी करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना स्मृतीस्थळ परिसरातून बाहेर काढण्याची मागणी केली..तर शिंदे गटाकडूनही ठाकरे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली..तर पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना शिवतीर्थावरुन बाहेर जाण्याची विनंती केली.. मात्र शिवतीर्थावरुन बाहेर येताच दोन्ही गटात पुन्हा जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola