Exams : मुंबईतील सर्व स्वायत्त कॉलेजेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन घेणार
Continues below advertisement
मुंबई विद्यापीठाप्रमाणेच मुंबईतील सर्व स्वायत्त संस्था आणि महाविद्यालयांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात अशी सूचना उच्च व तंत्रशिक्षण विभागानं केल्या आहेत. अंतिम वर्षांचा निकाल वेळेवर जाहीर करता यावा यासाठी सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठानं घेतलाय. तर मुंबईतील स्वायत्त शिक्षण संस्थांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याची तयारी केली होती. त्याविरोधात विद्यार्थ्यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाला पत्र लिहून ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर या विभागानं अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या सूचना स्वायत्त संस्था, महाविद्यालयांना केल्या आहेत.
Continues below advertisement