Indurikar Maharaj अडचणीत? अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणार?

इंदोरीकर महाराजांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण इंदोरीकरांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.. इंदोरीकरांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हीडिओत इंदोरीकरांनी जातीवाचक विधान करत समाजात तेढ निर्माण होईल असं विधान केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केलाय. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीने ठाण्यातील वर्तक नगर पोलिसांत लेखी फिर्याद दाखल केलीय. या संदर्भात  चौकशी करुन दोन दिवसात योग्य ती कारवाई करू असे आश्वासन पोलिसांनी दिल्याचं वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी म्हटलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola