International School | महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण बोर्डाच्या शाळा बंद करण्याला विरोध | ABP Majha
फडणवीस सरकारच्या काळात सुरू झालेल्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण बोर्डाच्या शाळा बंद करण्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या निर्णयाविरोधात पालकांनी राग व्यक्त केला आहे. या शाळा बंद करण्याआधी सरकारनं एकदा विद्यार्थ्यांची प्रगती बघून, मग निर्णय घ्यायला हवा होता असं या पालकांचं म्हणणं आहे. आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून काढून, आम्ही महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण बोर्डाच्या शाळेत आम्ही प्रवेश घेतला होता. आता त्याच शाळा बंद होणार असतील, तर आम्ही करायचं काय, असा प्रश्न या पालकांनी विचारला आहे. आमच्या मुलांच्या भवितव्याशी का खेळत आहात, असाही त्यांचा प्रश्न आहे.