
ATM Fire Robbery : 77 लाख रुपये लंपास करून कॅश लोडर्सनं पेटवलं ATM, चौकशीत फुटलं बिंग
Continues below advertisement
पैशांच्या हव्यासामुळे एटीएममध्ये कॅश भरणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच 77 लाख रुपये काढून एटीएमला आग लावल्याचा प्रकार समोर आलाय. मुंबईत गोरेगावमध्ये एसबीआयच्या एटीएममधून 77 लाख रुपये लंपास करून दोघा एटीएम कॅश लोडरनी एटीएमला आग लावली. 10 फेब्रुवारीला या एटीएमला आग लागली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत या दोघांचं बिंग फुटलं. पोलिसांनी जेव्हा एक्सपर्टच्या मदतीनं तपास केला तेव्हा जळलेल्या एटीएममध्ये नोटांची राख किंवा कोणतेही अवशेष सापडले नाहीत. कॅश लोडर रितिक यादव आणि प्रवीण पेंकलकर यांनी 10 दिवसांपूर्वीच एटीएम बंद असल्याची आणि त्यातून पैसे येत नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर दोघांनी कंपनीकडून एटीएम पासवर्ड घेऊन त्यातील 77 लाख रुपये काढले होते आणि त्यानंतर बिंग फुटू नये म्हणून एटीएमला आग लावली होती, अशी माहिती तपासात पुढे आली.
Continues below advertisement