Atal Setu Selfie Point : अटल सेतूवर सेल्फीवीरांची जत्रा ! या अतिउत्साहाला ब्रेक कधी ?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAtal Setu Selfie Point : अटल सेतूवर सेल्फीवीरांची जत्रा ! या अतिउत्साहाला ब्रेक कधी ? मुंबई आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या अटल सागरी सेतूवर एक वेगळाच अडथळा प्रवाशांना सहन करावा लागतोय. तो म्हणजे सेल्फी काढण्यासाठी थांबणाऱ्या वाहनचालकांचा. त्यामुळं या बेशिस्त आणि सुरक्षेची अजिबात पर्वा नसलेल्या वाहनचालकांना पोलिसांनी दंड ठोठावण्यास सुरुवात केलीय. आतापर्यंत ५०० वाहनचालकांना चलान पाठवण्यात आलं आहे. या पुलावर ताशी १०० किलोमीटर इतकी वेगमर्यादा आहे. तसंच वाहनांना थांबण्यास सक्त मनाई आहे. पण शनिवारी सकाळी आठ वाजता हा पूल सामान्यांसाठी सुरू झाल्यापासून कुठल्याही वेळी इथं शेकडो वाहनं थांबलेली असतात. त्यावर सोशय मीडियावरून प्रचंड टीका झाल्यावर मुंबई आणि नवी मुंबई पोलिसांना जाग आली. आणि रविवार संध्याकाळपासून वाहनचालकांकडून दंड आकारण्यास सुरुवात झाली.