Atal Setu Accident : अटल सेतूवर अपघात, सीटबेल्टमुळे वाचले तीन मोलाचे जीव ABP Majha

Continues below advertisement

Atal Setu Accident : अटल सेतूवर अपघात, सीटबेल्टमुळे वाचले तीन मोलाचे जीव
सीटबेल्टचा वापर टाळणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. अटल सेतूवर रविवारी एका मारुती सुझुकी इग्निस कारचा भीषण अपघात झाला. झारा साकीर असं चालक महिलेचं नाव आहे. महत्त्वाचं म्हणजे कारमधले सर्व प्रवासी सुखरुप आहेत. आणि याचं एकमेव कारण म्हणजे त्या सर्वांनी सीटबेल्ट लावले होते. सीटबेल्ट लावले नसते तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. य़ाचं कारण म्हणजे अशा अपघातांमध्ये सीट बेल्ट लावला नसेल सीटवर डोकं आपटून किंवा गाडीतून बाहेर फेकलं जाऊन गंभीर जखमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रवास जवळचा असो किंवा लांबचा, शहरातला असो किंवा महामार्गावरचा, सर्व प्रवाशांनी सीटबेल्ट लावलेच पाहिजेत, त्यात कुठलीही तडजोड करू नका असं आवाहन एबीपी माझा आपल्या प्रेक्षकांना करतंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram