Ashok Chavan : आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा उठवली तरच फायदा होईल : अशोक चव्हाण

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण दिल्लीत दाखल झालेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. आरक्षणासंदर्भातले निर्णय घेण्याचा अधिकार फक्त केंद्र सरकारला असल्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं अधोरेखित झालंय. त्यामुळं आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल करत, राज्याला अधिकार देण्यासाठी केंद्र सरकारनं पावसाळी अधिवेशनात निर्णय घ्यावा अशी मागणी अशोक चव्हाणांनी केली आहे. यासंदर्भात अधिवेशनात मुद्दा उपस्थित करण्याची विनंती अशोक चव्हाणांनी संजय राऊत आणि इतर खासदारांना केली आहे... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola