Ashish Shelar on Mumbai Water Supply :मुंबईतील पाणीवाटपाची श्वेतपत्रिका काढा, आशिष शेलार यांची मागणी

Continues below advertisement

Ashish Shelar on Mumbai Water Supply :मुंबईतील पाणीवाटपाची श्वेतपत्रिका काढा, आशिष शेलार यांची मागणी

मुंबई : मुंबई महापालिकेत (Mumbai Mahanagar Palika) एकाच परिवाराची सत्ता गेली 25 वर्षे आहे. त्यांनी मुंबईकरांकडून तीस हजार कोटी रुपये करापोटी घेऊनही मुंबईकरांना पुरेसे पिण्याचे पाणी (Mumbai water supply) उपलब्ध करून दिले नाही. झालेला खर्च आणि मिळणारे पाणी याची सत्त्यता समोर येण्यासाठी "मुंबईच्या पाण्याची" एक श्वेतपत्रिका जाहीर करण्यात यावी, अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आज (दि.28) विधानसभेत केली. मुंबई महापालिकेच्या (Mumbai Mahanagar Palika) 24 तास पाणीपुरवठा (Mumbai water supply) योजनेचा पूर्ण बोजवारा उडाला असून या योजनेतची चौकशी करण्यात यावी,असेही आशिष शेलार म्हणाले. 

विधानसभेत आज सत्ताधारी पक्षातर्फे मुंबई, ठाणे , पुणे, नाशिक, नागपूर, या शहरांमध्ये महायुती सरकार तर्फे करण्यात आलेली कामे आणि गतिमान विकास याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आभार मानणारा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावाची मांडणी करताना मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी मुंबईकरांच्या अजूनही काही अपूर्ण राहिलेले अपेक्षांकडे सरकारचे लक्ष वेधले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram