प्रबोधनकार ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात राज ठाकरेंना निमंत्रण द्या : Ashish Shelar यांची मित्रासाठी बॅटिंग
'प्रबोधनमधील प्रबोधनकार' या ग्रंथाचे उद्या प्रकाशन होत आहे. याच प्रकाशनाच्या कार्यक्रमात प्रबोधनकारांच्या विचारांचा वारसा आणि व्यासंग असलेले प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू अर्थात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुद्धा राजशिष्टाचारनुसार बोलवावे, असे पत्र भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. मात्र, अचानक आशिष शेलार यांनी या कार्यक्रमला राज ठाकरे यांना निमंत्रित करण्याबाबत थेट मुख्यमंत्री यांना विनंती केल्याने अनेकांच्या भुवय्या उंचवल्यात.