Theater Reopen : राज्यभरातील नाट्यगृह सुरू, मुंबईच्या रंगशारदामध्ये प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद
आजपासून राज्यभरातील नाट्यगृहे प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आले आहेत त्यामुळे नाट्यक्षेत्रातील कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुन्हा एकदा थिएटर्स, नाट्यगृहं प्रेक्षकांसाठी खुली झाली असून थिएटर्स आणि नाट्यगृहांसाठी राज्य सरकारनं ५० टक्के आसनक्षमतेची अट घातली आहे. तसंच कोरोना नियमांचं पालन करणं यावेळी बंधनकारक असेल. नियमांचं पालन न झाल्यास राज्य सरकारकडून कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. मुंबईतील रंगशारदा नाट्यगृहात ही आज तिसरी घंटा वाजली आणि प्रेक्षकांचा ही चांगला प्रतिसाद मिळाला.
Tags :
Maharashtra Mumbai Pune Nashik Theatre Nanded Cinema Hall Theaters Mumbai Theaters Theater Reopen Prashant Damle Theatre Reopen Rangsharda