Gujarat Girnar Hill : चार वर्षाच्या शर्विका म्हात्रेची कमाल, गुजरातचं गिरनार शिखर केलं सर
Continues below advertisement
रायगडमधली अवघ्या चार वर्षांची बालगिर्यारोहक शर्विका म्हात्रे हिनं गुजरातमधील गिरनार शिखऱ सर करत आपल्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवलाय 19 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तिनं ही कामगिरी केली आहे. गिरनार शिखरावर चढण्यासाठी 10 हजार पायऱ्यांचा टप्पा पूर्ण करावा लागतो. चिमुरड्या शर्विकानं हा ट्प्पा 17 तासात पूर्ण केलाय. 18 ऑक्टोबरला रात्री दहा वाजता प्रवासाची सुरुवात केलेल्या शर्विकानं कोजागिरीच्या पहाटे चार वाजता गिरनार पर्वतावर तिरंगा आणि भगवा ध्वज फडकवला.
Continues below advertisement