Palghar Ganesha Idol : पालघरमध्ये फळभाज्यांवर अष्टविनायक साकारणारा अवलिया कलाकार! पाहा सुंदर कलाकृती
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपालघर मधील भाताने येथील रहिवाशी असलेल्या कौशिक जाधव या कला शिक्षकाने फळ व कंद भाज्यांवर अष्टविनायक प्रतिकृत्या साकारल्या आहेत. आलं , बटाटे , गाजर , भोपळा मिर्ची , फ्लॉवर ,टोमॅटो,या फळ भाज्यांवर कौशिक जाधव यांनी हे अष्टविनायक साकारले असून फळ भाज्यांच्या आकारानुसार त्याला रंगरंगोटी करून या फळ भाज्यांना बाप्पांचा आकार देण्यात आला आहे.
कौशिक जाधव हे एका संस्थेच्या शाळेत कला शिक्षक म्हणून कार्यरत असून ही कला ते विद्यार्थ्यांना ही अवगत करून देत आहेत. फळ भाज्यांवर साकारलेल्या या प्रतिकृत्यांसाठी जाधव यांना कमी खर्च आणि कमी वेळ गेला आहे. जाधव यांनी तयार केलेल्या या आकर्षक अष्टविनायकाच्या प्रतिकृत्या पाहण्यासाठी स्थानिक ही गर्दी करत आहेत.
काही दिवसांत बाप्पाचं आगमन होणार असून या साठी सर्वत्र उत्साहाचं वातावरण आणि कामांची लगबग सुरू आहे. कोरोना काळामुळे गणेशोत्सवावरही काही प्रमाणात निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे अशाच काही वेगळ्या संकल्पनाना वाव देण्याची गरज असल्याची मागणी जाधव यांनी केली आहे.