वसई पालिकेकडून फेरीवाल्यांची अॅंटिजेन टेस्ट, दिवसभरात 184 जणांची चाचणी, तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह
Continues below advertisement
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वसई विरार महापालिकेने आता कॅम्प लावून अँटिजेन टेस्ट करायला सुरुवात केली आहे. आज वसई पश्चिम स्टेशन परिसरात दोन कॅम्प लावून परिसरातील फेरीवाल्याची कोव्हिड अँटिजेन टेस्ट केल्या आहेत. सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत दोन कॅम्प मध्ये 184 जणांच्या टेस्ट केल्या असून यात 3 फेरीवाले पॉझिटिव्ह आले आहेत. तर 181 जण निगेटिव्ह आले आहेत. वसई विरार महापालिका हद्दीत मागच्या आठवडा पासून कोरोना पूर्ण नियंत्रणात आला आहे. पुन्हा सार्वजनिक ठिकाणाहून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी फेरीवाल्यांची टेस्ट करायला सुरुवात केली असल्याचे सांगण्यात आले आहे.
Continues below advertisement