Sambhajiraje : सरकार माझ्यावर पाळत ठेवतंय, संभाजीराजे छत्रपती यांचा ठाकरे सरकारवर खळबळजनक आरोप

संभाजीराजे आज सिंधुदुर्गमध्ये आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराजेश्वर मंदिराचे वादळामुळे जे नुकसान झालंय त्याचे संभाजीराजे पाहणी करण्यासाठी जाणार होते. पण समुद्र खवळलेला असल्यानं ते किल्ल्यावर जाऊ शकले नाहीत. मात्र त्यानंतर ते सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी आणि काही व्यक्तींना भेटले असता त्या भेटीवेळी राज्य गुप्तचर विभागाचे पोलीस कर्मचारी साध्या वेषात उपस्थित राहिल्याचं त्यांचं म्हणणं आहे. शनिवारी संभाजीराजेंनी पुण्यात प्रकाश आंबेडकरांची पुण्यात भेट घेतली होती. त्या भेटीवेळी देखील साध्या वेशातील पोलिस उपस्थित होते, असा दावा संभाजीराजे यांनी केला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola