Anil Parab on ST Workers Protest : संप चिघळावा यासाठी विरोधकांचे प्रयत्न : अनिल परब ABP Majha
ST Workers Protest : एसटी कर्मचाऱ्यांचा संप तीव्र होत चालला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटलं की, कोर्टानं दिलेल्या निर्देशाप्रमाणे कमिटी नेमली आहे. कर्मचाऱ्यांची मागणी कमिटीपुढे जाऊन मांडावी लागेल. कमिटी जो अहवाल देईल तो सर्वांना लागू असेल. इन्क्रिमेंटची मागणी वगळता माझ्या अखत्यारितील मागण्या मान्य झाल्या आहे. कोर्टानं संप बेकायदेशिर ठरवलाय. कामगार राजकीय बळी ठरले तर ते दुर्देवी असेल, असं परब म्हणाले.
परब म्हणाले की, काल सदाभाऊ खोतांना मी समजावून सांगितलं, चर्चा झाली पण त्यांनी बाहेर जाऊन भलतंच सांगितलं. दोन्ही विरोधी पक्षनेत्यांशी बोलायला मी केव्हाही तयार आहे. संप सुरुच राहीला, तर एसटीचं मोठं नुकसान होईल. कामगार राजकीय बळी ठरले तर ते दुर्देवी आहे. विलीनीकरणाची मागणी ताबडतोब 2-4 दिवसांत पूर्ण होणार नाही, वेळ लागेल, असं ते म्हणाले.