ABP News

Anil Parab PC : मी चौकशीला सामोरं जायला तयार; झीशान सिद्दिकींना अनिल परबांचं उत्तर

Continues below advertisement

मी चौकशीला सामोरं जायला तयार- अनिल परब

आरोप करण्यापेक्षा ते सिद्ध करून दाखवा- अनिल परब

झीशान सिद्दिकींना काही अडचण असेल तर पोलिसांकडे जावं- परब

सिद्दिकींची हत्या होण्यामागे आणखीही कारणं असतील- परब

'छोटा शकीलने यांना धमकी दिली होती अशीही चर्चा होती'

झीशान यांचं समाधान झालं नसेल तर त्यांनी पुन्हा तक्रार करावी-परब

११ बिल्डर कोण आहेत याची चौकशी पोलिसांनी करावी- परब

झिशान सिद्दीकींच्या जबाबात काय?

झिशान सिद्दीकी पोलीस जबाबात म्हटलंय की, मी वांद्रे पूर्व मतदारसंघातील संत ज्ञानेश्वर नगरमध्ये राहणाऱ्या लोकांविरुद्ध सतत आवाज उठवत होतो आणि निषेध करत होतो. मी स्थानिक आमदार होतो, त्यामुळे नागरिकांचा मुद्दा मी मांडत होतो.  या काळात, माझा कोणताही दोष नसतानाही खेरवाडी पोलीस ठाण्यात माझ्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. या ठिकाणाच्या विकास आराखड्याचे सर्वेक्षण सुरू होण्यापूर्वी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी महासभेच्या ठरावासाठी तेथे राहणाऱ्या लोकांची बैठक बोलावली. त्यावेळी ते म्हणाले की, जर तुमचा माझ्यावर (अनिल परब) विश्वास असेल तर मी कोणत्याही बांधकाम व्यावसायिकाला आणीन, तुम्ही त्याला मान्यता द्या...त्यानंतर, मी (झीशान सिद्दीकी) पुन्हा तिथे राहणाऱ्या लोकांसोबत बैठक घेतली आणि त्यांना सांगितले की तुम्ही कोणताही बिल्डर निवडू शकता पण बिल्डर निवडण्यापूर्वी कागदपत्रे वाचा आणि कोणत्याही दबावाशिवाय त्यावर सही करा. यानंतर, पृथ्वी चव्हाण नावाच्या एका विकासकाने माझ्याशी संपर्क साधला आणि मला आश्वासन दिले की काळजी करू नका आणि आम्ही त्याच ठिकाणी राहणाऱ्या लोकांना घरांच्या बदल्यात घरे देऊ...यानंतर मी महासभेच्या ठराव बैठकीतही भाग घेतला, असं झिशान सिद्दीकी म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram