Dhananjay Munde emotional : धनंजय मुंडे भावनिक, म्हणाले, मुलांना मित्र काय म्हणत असतील विचार करा!

Continues below advertisement

Dhananjay Munde emotional : धनंजय मुंडे भावनिक, म्हणाले, मुलांना मित्र काय म्हणत असतील विचार करा!

 

 ज्यावेळेस व्यक्तिगत तुमच्यावर कुठलेही खोटे आरोप होतात डायरेक्ट तुमच्यावरती आणि तुम्हाला जर लहान मूल असेल आणि ती जर तिसरीला शाळेत जात असेल ना तर त्या मुलीला तिच्या मित्र आणि मैत्रिणी काय म्हणत असतील याचा विचार करा आहे ते मागणी पाटील या सगळ्या आरोंचा तुम्हाला त्रास झाला पर्सनली त्रास झाला ज्या पद्धतीने?

हे ही वाचा.

 सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali damania) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन बीडमधील वाल्मिक कराडची दहशत आणि मंत्री धनंजय मुंडेंचे व त्यांच्या कुटुंबीयांचे वाल्मिक कराडशी असलेले व्यक्तिगत संबंध, तसेच आर्थिक संबंधाचे पुरावेही त्यांना दिले. तसेच, मी अजित पवारांना जे पुरावे दाखवले ते त्यांनी बारकाईने पाहून घेतले असून ते नक्कीच गंभीर आहेत. त्यामुळे, ते धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच, आज दुपारी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट होणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. तत्पूर्वी आज कॅबिनेट बैठकीनंतर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांनीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. या भेटीनंतर माध्यमांशी प्रतिक्रिया देताना व अंजली दमानिया यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आपण उत्तर देणार नसल्याचे त्यांनी म्हटले. 

अंजली दमानियांनी अजित पवारांची भेट घेऊन राजीनामा मागितला, त्यासंदर्भातील प्रश्नावर मी उत्तर देणार नाही. अंजली दमानिया अजित पवार यांना भेटल्या, त्यामुळे मुख्यमंत्री आणि उमुख्यमंत्री अजित पवार यावर उत्तर देतील आणि त्यांनीच द्यावं अशी माझी अपेक्षा आहे, असे धनंजय मुंडेंनी म्हटले. तसेच,  अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपावर बोलताना, राखेसंदर्भात थर्मस पावर स्टेशननं केलेला तो कचरा आहे, तो कचरा साफ करायचं काम संबंधित स्टेशनचं आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने 2006 च्या निर्णयात म्हटलं आहे. त्यामुळे, प्रॉफिट ऑफ बेनिफिटचा निर्णय येतच नाही, असेही मुंडे म्हणाले.  



 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola