Anil Deshmukh : अनिल देशमुख यांच्या खांद्याला दुखापत, डॉक्टर म्हणतात... ABP Majha
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खांद्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आलीय... दोन तीन दिवसांपूर्वी आर्थर रोड तुरुंगात बाथरुममध्ये पाय घसरुन पडले होते... आणि यातच त्यांच्या खांद्याला दुखापत झाली, देशमुख यांना ४० वर्षापासून हाताचा सांधा डिसलोकेट होण्याचा त्रास आहे... त्यानंतर हाताचा त्रास वाढल्यानं २ एप्रिलला जे. जे. रुग्णालयात दाखल केलंय.. आता एमआरआय रिपोर्टनंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया करण्याची शक्यता आहे... सध्या त्यांना अस्थिव्यंग विभागात दाखल करण्यात आलं असून एमआरआय अहवालानंतरच आता अधिकची माहिती समोर येईल....