आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ED च्या आरोपपत्रात Anil Deshmukh यांच नाव नाही, दिलं 'हे' कारण

अनिल देशमुखांशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी ईडीनं सादर केलेल्या आरोपपत्रात त्यांचचं नाव नसल्याची माहिती समोर येतेय. अनिल देशमुखांची अद्याप चौकशीच झालेली नसल्याचं कारण ईडीचे अधिकारी याबाबत खाजगीत बोलताना देत आहेत. या प्रकरणी वारंवार समन्स बजावूनही अनिल देशमुख अद्याप चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. उलट समन्स रद्द करण्यासाठी त्यांची न्यायालयीन लढाई सुरू आहे.

इडीच्या आरोपपत्रात सचिन वाझेसह 14 जणांविरोधात आरोप लावण्यात आलेत. ज्यात अनिल देशमुखांचे सहाय्यक पालांडे आणि कुंदन शिंदे यांचा समावेश आहे. मुंबईतील बार मालकांकडून वसुली प्रकरणात हे आरोपपत्र सादर करण्यात आलं आहे. या प्रकरणी शेकडो कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा तपास यंत्रणेचा संशय आहे. या प्रकरणी वारंवार समन्स बजावूनही अनिल देशमुख अद्याप चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. उलट समन्स रद्द करण्यासाठी त्यांची न्यायालयीन लढाई सुरू आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola