Uddhav Thackeray : पैठण येथे संतपीठ सुरू करणार; उद्धव ठाकरेंचं आश्वासन
मराठवाड्यात संताची शिकवण सांगण्यासाठी संतपीठ हवं असं सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, पैठण येथे संतपीठाचा अभ्यासक्रम सुरू करणार असून त्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे देण्यात येईल. राज्यात आज हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर असून ते विविध कार्यक्रमात भाग घेणार आहेत.