Anil Deshmukh Money Laundering Case : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी...
Continues below advertisement
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे मनी लाँड्रिंगप्रकरणी अनिल देशमुखांचा कोठडीतला मुक्काम वाढला आहे. अनिल देशमुखांनी ईडीची कोठडी वाढवून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. पण आता त्यांना 14 दिवस न्यायालयीन कोठडीत रहावं लागणार आहे.
ईडी कोठडी संपल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुनावणीसाठी कोर्टात हजेरी लावली होती. ईडीकडून देशमुख्यांच्या 9 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. पण ती न्यायालयाने नाकारली आणि देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
Continues below advertisement
Tags :
Mumbai ED Anil Deshmukh Anticipatory Bail Anil Deshmukh Ed Anil Deshmukh Money Laundering Case Hrishikesh Deshmukh Hrishikesh Deshmukh Money Laundering Case Hrishikesh Deshmukh