Anil Ambani : अनिल अंबानी यांना कोर्टाचा दिसाला,दंडाच्या नोटिशीनुसार तूर्तास कारवाई न करण्याचे आदेश
Continues below advertisement
काळा पैशांसंबंधी कायदा तसेच 2015 च्या कर कायद्यांतर्गत जारी केलेल्या कारणे दाखवा नोटिशीला अंबानी यांनी न्यायालयात आव्हान दिलं होतं.. याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. स्विस बँकेच्या खात्यांमध्ये जमा असलेल्या 814 कोटींहून अधिक किमतीच्या अघोषित निधीवरील कर चुकवल्याबद्दल प्राप्तिकर विभागाने 9 ऑगस्ट रोजी अनिल अंबानी यांना नोटीस बजावली होती. ही कारवाई मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारी आहे, असा दावा करीत अंबानी यांनी न्यायालयात दाद मागितली.
Continues below advertisement