Angarki Sankashti Chaturthi 2021 : घरातूनच सिद्धिविनायकाचं दर्शन घ्या, आदेश बांदेकर यांचं आवाहन
वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
27 Jul 2021 09:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगणेशभक्तांसाठी महत्वाची बातमी आज अंगारकी चतुर्थी आहे. आणि यानिमित्तानं मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात दरवर्षी दर्शनासाठी गर्दी होत असते. मात्र यावेळी कोरोना संकटामुळे मंदिराबाहेर गर्दी करू नका कारण एबीपी माझावर घरबसल्या तुम्हाला सिद्धिविनायकाचं दर्शन आम्ही घडवत आहोत. भक्तांनी गर्दी करू नये अशी विनंती सिद्धिविनायक मंदिर न्यासातर्फे करण्यात आली आहे. कोरोना संसर्गामुळे मंदिर आहे मात्र अनेक भक्त मंदिराबाहेरून मुखदर्शन करण्यासाठी भाविक गर्दी करतात. मात्र तशी टाळण्याचं आवाहन एबीपी माझाही आपल्याला करत आहे. तसंच सिद्धिविनायक मंदिर न्यासातर्फेही २४ तास ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात आलेय.