MHADA Lottery 2021 : खुशखबर! यंदाच्या दसऱ्याला 9 हजार घरांची सोडत

Continues below advertisement

परवडणारं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे कारण तब्बल दोन वर्ष रखडल्यानंतर म्हाडाच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळालाय. यंदा दसऱ्याला म्हाडाच्या ९ हजार घरांची सोडत निघणार आहे. त्यामुळे मुंबईलगतच्या भागात परवडणाऱ्या किमतीत घरं घेण्याचं अनेकांचं स्वप्न होणार आहे. यापूर्वी २०१८ मध्ये म्हाडाच्या घरांची सोडत निघाली होती. पंतप्रधान आवास योजनेतील ६५००, कोकण मंडळाच्या गृहप्रकल्पातील दोन हजार तर २० टक्के योजनेतील ५०० घरांचा या सोडतीत समावेश आहे. अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी ही घरे असतील, मीरारोड, ठाण्यातील वर्तकनगर, विरारमधील बोळींज, कल्याण, वडवली, आणि ठाण्यातील गोठेघर इथे ही घरं असतील

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram