Angadia Extortion Case : DCP Saurabh Tripathi यांच्या निलंबनाच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांची सही
मुंबई: अंगाडिया व्यावसायिकांकडून खंडणी वसुलीप्रकरणी पोलीस उपायुक्त सौरव त्रिपाठींवर अटकेची टांगती तलावर आहे. या प्रकरणात पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे. अंगाडिया व्यावसायिकांना चुकीच्या पद्धतीनं ताब्यात घेऊन खंडणी वसूल केल्याचा आरोप सौरव त्रिपाठींसह चार पोलिसांवर आहे. या प्रकरणी पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांना मुंबई पोलिसांनी फरार आरोपी म्हणून घोषित केले आहे. तर तीन पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
Tags :
Maharashtra News Mumbai Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Khandani Angadiya Saurabh Tripathi