Eknath Khadse यांच्या गुडघेदुखीवर मधमाशी उपचार पद्धती, काय आहे Honey Bee Treatment

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे सध्या गुडघेदुखीवर मधमाशी उपचार घेतायत. विशेष म्हणजे या उपचार पद्धतीचा त्यांना फायदा झाल्याचा त्यांचा अनुभव आहे. औरंगाबादमधील नैसर्गिक उपचार तज्ज्ञ डॉक्टर नांदेडकर यांच्याकडून खडसे उपचार घेतायत. मधमाशांद्वारे चावा घेऊन विविध आजारांवर नैसर्गिक उपचार करण्याची पद्धती आहे. या पद्धतीचा फायदा झाल्यानं एकनाथ खडसे त्यांच्या मुक्ताई नगरमधील फार्म हाऊसवर शिबीरही आयोजित करतात. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola