Andheri Mobile Robbery | पादचाऱ्यांचे फोन लांबवणारे जेरबंद
पादचाऱ्यांचे फोन हिसाकवत धूम ठोकणाऱ्या तिघा चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय. या दोघा जणांवर 20 पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. या दोघा आरोपींकडून मोबाईलह एक रिक्षा हस्तगत करण्यात आलीय. अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवर धावत्या रिक्षातून पादचाऱ्याचा मोबाईल हिसकावून ते फरार झाले होते. संतोष पवार , हसमुद्दीन कुरेशी आणि परेश राठोड अशी या आरोपींची नावं आहेत. अंधेरी पोलिसांनी सापळा रचत त्यांना जेरबंद केलं.