Andheri Gokhale Bridge : अंधेरीतील धोकादायक गोखले पूल बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग कोणते? ABP Majha
मुंबईत अंधेरी इथे पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय.. धोकादायक असल्यामुळे मुंबई महापालिकेने हा पूल बंद करण्याचं पत्र वाहतूक पोलिसांना दिलं होतं. पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडणारा हा पूल आहे.. पूल वाहतुकीसाठी बंद झाल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.. पर्यायी वाहतुकीसाठी सहा मार्गांची व्यवस्था करण्यात आलीय.. पुनर्बांधणीसाठी हा पूल किमान दोन वर्षे सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी सुचवलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पालिकेनं केलंय.