Andheri Gokhale Bridge : गोखले उड्डाणपुलाच्या गर्डर उभारणीसाठी 20 दिवसांचा रात्रब्लाॅक

Continues below advertisement

Andheri Gokhale Bridge : गोखले उड्डाणपुलाच्या गर्डर उभारणीसाठी 20 दिवसांचा रात्रब्लाॅक अंधेरी पूर्व-पश्चिमसह पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले उड्डाणपुलाच्या गर्डर उभारणीसाठी २७ नोव्हेंबरपासून २० दिवसांचा ब्लॉक घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ब्लॉक कालावधीत लोकल फेऱ्या रद्द राहणार असल्याने येत्या आठवड्यापासून प्रवाशांच्या त्रासात भर पडण्याची शक्यता आहे. ब्लॉक वेळेत रेल्वेगाड्यांवर किमान परिणाम होण्यासाठी रात्रकालीन ब्लॉकचे नियोजन केले आहे. रोज सरासरी ३-४ तासांत ब्लॉक घेण्यात येणार आहे. येत्या काही दिवसात ब्लॉकचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी सांगितले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram