Andheri Fire: मुंबईतल्या अंधेरीत चित्रकूट मैदानावरील सिनेमाच्या सेटला आग, विझवण्यासाठी प्रयत्न सुरु
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईच्या अंधेरी पश्चिम भागातील चित्रकुट मैदानात तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या चित्रपटाच्या सेटवरील सामानाला आग लागली. घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या. सिनेमाच्या सेटमधील बहुतांश सामान ज्वलनशील असल्याने आग वेगानं पसरली आहे.आग लागल्यामुळे संपूर्ण परिसर धुराने व्यापला असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय... प्राथमिक माहितीनुसार, चित्रकुट मैदानावर रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या आगामी चित्रपट 'लव रंजन'चा सेट उभारण्यात आला होता. सेट वर लाईटिंगचे काम सुरू होते त्यावेळी आग लागली आहे. पुढील आठवड्यापासून चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात होणार होती. शेजारी राजश्री फिल्मचे दोन सेट होते. त्याला आग लागलेली नाही. चित्रपटाचे नाव निश्चित नसून काही दिवसापूर्वी त्याचे शुटिंग पॅरिसला झाले. सेटचे काम सुरू असल्याने मोठ्या संख्या मध्ये कामगार आगीमध्ये अडकल्याचा अंदाज आहे