Cruise Drugs Party : क्रूझ ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री अनन्या पांडेची आज तिसऱ्यांदा NCBकडून चौकशी

अभिनेत्री अनन्या पांडेला आज पुन्हा एनसीबीने चौकशीसाठी बोलवलं आहे. सकाळी 11 वाजता एनसीबीसमोर हजर राहण्याचे निर्देश तिला देण्यात आले असून शुक्रवारी तिची साडेतीन तास चौकशी करण्यात आली होती. क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानसोबत झालेल्या चॅटच्या आधारावर अनन्याला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. गांजाच्या देवाणघेवाणीबाबत आर्यन आणि अनन्यामध्ये चॅट झाल्याचा आरोप होतो आहे. पहिल्या दिवशी चौकशीदरम्यान अनन्याने हे सर्व आरोप फेटाळले होते. शुक्रवारी चौकशीसाठी उशिरा पोहोचल्याने समीर वानखेडे यांनी अनन्याला खडेबोल सुनावले होते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola