Cruise Drugs Party : समीर वानखेडे यांनी खडसावल्यानंतर आज ही अनन्या पांडेकडून वेळेचं उल्लंघन

Continues below advertisement

अभिनेत्री अनन्या पांडेला आज पुन्हा एनसीबीने चौकशीसाठी बोलवलं आहे. सकाळी 11 वाजता एनसीबीसमोर हजर राहण्याचे निर्देश तिला देण्यात आले असून शुक्रवारी तिची साडेतीन तास चौकशी करण्यात आली होती. क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानसोबत झालेल्या चॅटच्या आधारावर अनन्याला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. गांजाच्या देवाणघेवाणीबाबत आर्यन आणि अनन्यामध्ये चॅट झाल्याचा आरोप होतो आहे. पहिल्या दिवशी चौकशीदरम्यान अनन्याने हे सर्व आरोप फेटाळले होते. शुक्रवारी चौकशीसाठी उशिरा पोहोचल्याने समीर वानखेडे यांनी अनन्याला खडेबोल सुनावले होते पण त्याचा फारसा परिणाम तिच्यावर झाल्याचे दिसत नाहीए कारण आज सुध्दा अनन्या वेळेचं उल्लंघन केलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram