Amruta Fadnavis on Traffic jam Divorce : अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यावर विरोधकांची टिका ABP Majha

देवेंद्र फडणवीसांप्रमाणेच त्यांच्या पत्नी अमृता या ठाकरे सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही... मुंबईतल्या वाहतूक कोंडीवरुन सरकारवर टीकास्त्र डागताना अमृता फडणवीसांनी एक धक्कादायक दावा केलाय. मुंबईतल्या ट्रॅफिक जामममुळं अनेक जोडप्यांचे घटस्फोट होतात असा दावा अमृता फडणवीस यांनी केलाय. भाजपनं आयोजित केलेल्या कॅन्सरमुक्त अभियानाचा आज अमृता फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ झाला.  कार्यक्रमापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना अमृता फडणवीसांनी मुंबईकरांच्या समस्येबद्दल बोलताना ट्रॅफिक जाम आणि घटस्फोटाचं नातं जोडलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola