Road Work | अतिक्रमणं वाचवण्यासाठी अंबरनाथमध्ये रस्ता वळवण्याचा घाट? | ABP Majha

Continues below advertisement
अतिक्रमणं वाचवण्यासाठी चक्क रस्ताचं काम रखडल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये समोर आलाय..  यामुळे रस्त्याचं काम मात्र थांबलं असून नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय.. अंबरनाथ शहरातून एमआयडीसीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचं रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण सध्या सुरु आहे.. 55 कोटी रुपये खर्चुन एमएमआरडीएच्या मार्फत हे काम केलं जातंय.. या रस्त्यात अडसर ठरणारी शिवाजीनगर परिसरातील दुकानं तोडणं गरजेचं असून पालिकेनं निष्कासनाची कारवाई करणं अपेक्षित आहे.. मात्र पालिका निवडणूक तोंडावर असल्यानं पालिकेकडून अतिक्रमणं तोडायला चालढकल केल्याचा आरोप आहे.. अर्धा रस्ता खोदल्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. स्थानिकांनीही रखडलेल्या या कामाबाबत नाराजी व्यक्त केली असून मनसेनंही आंदोलनाचा इशारा दिलाय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram