Ambarnath Dumping Ground Fire | अंबरनाथच्या डम्पिंग ग्राऊंडला पुन्हा आग, सततच्या आगीमुळे झाले हैराण

अंबरनाथ शहराला लागून असलेल्या डम्पिंग ग्राऊंडला गेल्या दोन दिवसांत पुन्हा एकदा आग लागलीये. या आगीमुळे शहरात धूराचं साम्राज्य पसरलंय. शहराला लागूनच हे डम्पिंग ग्राऊंड असून डम्पिंगच्या बाजूलाच मोठी लोकवस्ती आहे. या डम्पिंगवर नव्याने कचरा टाकला जात असलेल्या ठिकाणी ही आग लागली असून आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर नागरी वस्तीत पसरतोय. मात्र अंबरनाथ नगरपालिकेकडून ही आग विझवण्याचे कुठलेही प्रयत्न अद्याप करण्यात आलेले नाहीयेत. त्यामुळे नागरिक मात्र त्रासले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola