Alia Bhatt:अभिनेत्री आलिया भटला विलगीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणात पालिकेकडून क्लीन चीट?
अभिनेत्री आलिया भटला मुंबई महापालिकेने क्लीन चीट दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. आलियानेे विलगीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केलं नसल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांकडून मिळतेय. आठ डिसेंबरला करण जोहरच्या पार्टीतील करीना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाली. या पार्टीत आलियासह अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. यानंतर आलिया पाच दिवस विलगीकरणात होती. सहाव्या दिवशी कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर ती मुंबईबाहेर गेल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याचं सूत्रांकडून समजतंय. त्यामुळे आता मुंबई पालिका आलियावर कोणतीही कारवाई करणार नसल्याचे संकेत मिळतायत.