Delhi: दिल्लीतील रोहिणी न्यायालयात झालेल्या स्फोटाचं गूढ उकललं,डीआरडीओच्या वैज्ञानिकाला अटक
Continues below advertisement
दिल्लीतील रोहिणी न्यायालयात झालेल्या स्फोटाचं गूढ उकललंय. पोलिसांनी या स्फोटप्रकरणी डीआरडीओच्या वैज्ञानिकाला अटक केलीय. त्यानेच न्यायालयात टिफीन बॉम्ब ठेवल्याचं समोर आलंय. या वैज्ञानिकाने आपल्या जुन्या भांडणाचा वचपा काढत शेजाऱ्याला मारण्यासाठी हा कट रचल्याचं समोर आलंय. आरोपी आणि त्याच्या शेजाऱ्यांमध्ये संपत्तीवरून वाद सुरू होते. त्या प्रकरणात शेजाऱ्याने आरोपी वैज्ञानिकाला न्यायालयात खेचलं होतं. सुनावणीला अनावश्यक दिरंगाई केल्याप्रकरणी कोर्टाने आरोपीला १ हजार रुपयांचा दंडही ठोठावला होता. याचाच राग मनात धरून आरोपीने हा कट रचल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Delhi Marathi News ABP Maza Top Marathi News दिल्ली Scientist ताज्या बातम्या Drdo ताज्या बातम्या Abp Maza Live Rohini Court दिल्ली Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News Mystery Of The Blast