Ajit Pawar on Shiv Sena : नियुक्ती आधी विश्वासात घ्यायला हवं होतं : अजित पवार
विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर आज विरोधी पक्षांतले मतभेद पुन्हा एकदा समोर आले. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेस आधीच नाराज असताना आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही शिवसेनेनं परस्पर घेतलेल्या निर्णयावर नाराजीचा सूर लावला. विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता नियुक्त करताना मित्रपक्षांना विचारात घ्यायला हवं होतं, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलीय. तर विरोधकांत एकोपा कायम राहावा अशी अपेक्षा काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलीय.