Ajit Doval meet Eknath Shinde:राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मुंबईत, एकनाथ शिंदेंची घेणार भेट
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आज मुंबईत आहेत. दुपारी 1 वाजता डोवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. तसंच ते पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचीही भेट घेणार आहेत. गेल्या काही दिवसांत मुंबईत घातपात घडवण्याच्या काही धमक्या आल्यात... तसंच श्रीवर्धन इथं संशयित बोटीवर सापडलेली एके-47 आणि शस्त्रास्त्रं यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्यात. याच पार्श्वभूमीवर डोवाल यांच्या या मुंबईतील गाठीभेटींना विशेष महत्त्व आहे.
Tags :
Ajit Doval Terrorists Mumbai Eknath Shinde Maharashtra Ajit Doval To Meet Eknath Shinde Mumbai Terrorists