Ajay Singhania Arrested : कुख्यात बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक

बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक करण्यात आलीय.... त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानीला यापूर्वीच अटक करण्यात आलीय. अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न तसेच धमकी देणाऱ्या प्रयत्न जयसिंघानी कुटुंबाकडून झाला होता... या प्रकरणी अमृता फडणवीस यांनी तक्रार दाखल केल्यानंतर तपासाची सूत्रे हालली आणि अखेर अनिल जयसिंघानीला मुंबई गुन्हे शाखेने गुजरातमधून अटक केली. जयसिंघांनी शिर्डीमार्गे गुजरातला गेला होता.. तिथंही तो सतत ठिकाणं बदलत होता. आधी बार्दोली, मग सुरत, आणि त्यानंतर गोधरा इथं पळाला. अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं त्याला कलोलमधून अटक केली. यामध्ये गुजरात पोलिसांची मदतही घेण्यात आली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola