Ajay Chaudhary Kishori Pednekar on Dasara Melava :...तर शिवसैनिक गनिमी काव्यानं शिवाजी पार्कवर येतील

Shivsena : शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांनाही मुंबई महापालिकेने (Mumbai Muncipal Corporation) परवानगी नाकारली आहे. यावर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) तसेच शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी (Ajay Chaudhary) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे, दरम्यान, शिवसेनेचा दसरा मेळावा गनिमी काव्यानं शिवतीर्थीवरच होणार असे सांगत शिंदे गटाला आव्हान केले आहे. तर पेडणेकर यांनी शिंदे गट रडीचा डाव खेळत आहेत, हा डाव भाजपाच्या माध्यमातून खेळला जातोय अशी प्रतिक्रिया दिली आहे. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटानं कोर्टात धाव घेतली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. दरम्यान, मुंबई पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे. त्यामुळे शिवाजी पार्क दसरा मेळाव्याला कुणालाच मिळणार नाही हे स्पष्ट झालं आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola