Mumbai Air Pollution :मुंबईच्या हवेची गुणवत्ता दिल्लीपेक्षा वाईट,हवा गुणवत्ता निर्देशांक २९०च्या पार

Continues below advertisement

मुंबईतील हवेची गुणवत्ता सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीपेक्षाही वाईट असल्याचं आढळून आलंय.. मुंबईतल्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक म्हणजे एक्यूआय हा २९० वर पोहोचलाय.. पण दिल्लीतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक १९३ वर आहे. त्यामुळं मुंबईतील एक्यूआय वाईट स्थितीत तर दिल्लीतील एक्यूआय मध्यम स्थितीत असल्याचं आढळून आलं. मुंबईतील बीकेसी परिसरात हवा गुणवत्ता निर्देशांक ३५४वर , अंधेरीत ३०७वर, नवी मुंबईत ३५३वर, तर कुलाब्यात २८६वर पोहोचला आहे. मुंबईतील सरासरीच्या तुलनेत मालाड आणि माझगावमधील हवा गुणवत्ता निर्देशांक मात्र चांगल्या स्थितीत असल्याचं आढळून आलं. मालाडमधील एक्यूआय १५२ तर माझगावातील एक्यूआय २३५वर आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram