Sanjay Raut With Mother: निवासस्थानी पोहोचताच राऊतांच्या मातोश्रींकडून औक्षण
Continues below advertisement
मुंबईतल्या कथित पत्रा चाळ आर्थिक घोटाळा प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेले शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज तब्बल १०२ दिवसानंतर तुरुंगाबाहेर आले. या प्रकरणात संजय राऊतांना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयानं जामीन मंजूर केला. राऊतांना जामीन मिळताच उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांमध्ये जणू नवी उर्जा संचारली. त्यांनी राऊतांच्या स्वागतासाठी आर्थर रोड जेल परिसरात मोठी गर्दी केली होती. पण विशेष म्हणजे राऊतांना जामीन मंजूर करताना पीएमएलए कोर्टानं राऊतांची अटक बेकायदेशीर असल्याचं सांगून ईडीला झापलं. त्यानंतर आर्थर रोड जेलमधली सर्व प्रक्रिया पूर्ण करुन संजय राऊत तुरुंगाबाहेर आले. राऊत तुरुंगाबाहेर येताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करून फटाक्यांची आतषबाजी केली. त्यांनी तुरुंगाबाहेर आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया ही एबीपी माझाला दिली.
Continues below advertisement