BMC Covid Patient : परवानगीनंतरच कोविड रुग्णांना दाखल करा, बेडची कमतरता भासू नये म्हणून पाऊल
दुसऱ्या लाटेप्रमाणे आताही मुंबईतल्या खासगी रुग्णालयात भरती होण्यासाठी कोविड रुग्णांना मुंबई महापालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. तशा सूचना मुंबई महापालिकेनं खासगी रुग्णालयांन दिल्यात. कोरोनाची तिसरी लाट आल्यामुळं, बेडची कमतरता भासू नये यासाठी मुंबई महापालिकेनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. खासगी रुग्णालयांना ८० टक्के कोविड बेडची उपलब्धता ठेवण्यास सांगण्यात आलंय. तसंच सरकारनं निर्देशित केलेले दर आकारणं खासगी रुग्णालयांना बंधनकारक असणार आहे.