Malvi Malhotra | लग्नाला नकार दिल्याच्या रागातून मित्राकडूनच अभिनेत्री मालवी मल्होत्रावर चाकू हल्ला
स्वरदा वाघुले
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिकांमधून झळकलेली अभिनेत्री मालवी मल्होत्रावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर मालवी मल्होत्रावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु आहे. काल रात्री मालवी मल्होत्रावर तिच्याच एका मित्राने जीवघेणा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अभिनेत्रीच्या मालवी मल्होत्राच्या शरीरावर तीन वार करण्यात आले आहेत. मालवी मल्होत्रावर करण्यात आलेल्या हल्ल्यासंदर्भात मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या मालवीची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.